क – कवितेचा – ‘महाकवी’
शेतकरी पेरतो जमीनचाड्यातून रुजवतो :काळ्या भिन्न मातीवर पिकांची बीजं जसं शिकणार पोरगं लिहितंकाळ्या भिन्न पाटीवर अबकडई…. अन् मगउगवून येतेमातीतून हिरव्यागार कणसांची कविता…. शेतकरी.. शेतकरी महाकवीच तर आहे!

खरं तर,ती कवी आहेचित्रकार आहे… तो ऑफिसला गेल्यानंतरघर फक्त तिचं असतं;मग ती जगते हवं तसंतिला चित्र काढायला आवडतं;ती चित्र काढतेदिवसभर खेळते रंगांशी…गुणगुणते एखादं आवडीचं गाणं !सायंकाळी तो घरी येतो,आता ती गाणं गुणगुणत नाही,ती मुकी होतेआणि…. आणि…उडून जातो,तिच्या कॅनव्हासवरून चेहऱ्यावर पसरलेला रंग ! तो घरी नसतो तेव्हाच फक्त;घर तिचं असतं !मग,घर आणि रात्र दोन्ही त्याचं होतं …